खारेपाटण ग्रामपंचायतीची ''पंचायत राज''मध्ये आघाडी

खारेपाटण ग्रामपंचायतीची ''पंचायत राज''मध्ये आघाडी

Published on

swt1210.jpg
30394
खारेपाटण ः समितीचे स्वागत करताना प्राची ईसवलकर, महेंद्र गुरव व सर्व सदस्य.

खारेपाटण ग्रामपंचायतीची
‘पंचायत राज’ मध्ये आघाडी
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : खारेपाटण ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ मध्ये सक्रिय सहभाग घेत अभियानाच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविले. ‘स्वच्छ गाव, निर्मल गाव, हरित गाव’ करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
खारेपाटण गावच्या माजी सरपंच व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर तसेच उपसरपंच महेंद्र गुरव आणि सर्व ग्रामपंचाय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. खारेपाटण ग्रामपंचायतीची पाहणी शासन नियुक्त टीमद्वारे करण्यात आली. ग्रामपंचायतीसह संपूर्ण गावाचे चित्रीकरण करण्यात आले. या टीमचे जिल्हा परिषद सदस्य ईसवलकर, उपसरपंच गुरव यांनी स्वागत करून ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गावचा शाश्वत विकास करण्यासाठी शासन ग्रामपंचायतींना बक्षीस रुपाने जी रक्कम अनुदान म्हणून देणार आहे, त्याचा उपयोग ग्रामपंचायतीने आपल्या गावचा विकास करण्यासाठी करणे गरजेचे आहे, असे ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com