चौकुळमध्ये महिला दिनी ''शिवीमुक्त शाळा''चा संकल्प

चौकुळमध्ये महिला दिनी ''शिवीमुक्त शाळा''चा संकल्प
Published on

swt124.jpg
30398
चौकुळ ः शाळा क्र. ४ च्या मुलांनी ‘शिवीमक्त शाळा’चा संकल्प केला.

चौकुळमध्ये महिला दिनी
‘शिवीमुक्त शाळा’चा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः जागतिक महिला दिनानिमित्त चौकुळ येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ४ शाळेने समाजाला सकारात्मक संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबविला. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ''शिवीमुक्त शाळा व शिवीमुक्त वाडी'' करण्याचा संकल्प करत शिवीगाळ न करण्याची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि समाजात सुसंवाद वाढावा, यासाठी पालकांनी सुध्दा घर, सार्वजनिक व कार्यालय परिसरात शिवीचा वापर करू नये, असा ठराव घेऊन ''शिवीमुक्त शाळा-शिवीमुक्त वाडी'' हा संकल्प करण्यात आल्याची मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी दिली. वाडीत कोणी शिवी दिल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
जागतिक महिला दिनी चौकुळ शाळेने महिला सन्मानाचा संदेश देत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत, घरी तसेच परिसरात कुठेही शिवीगाळ करणार नसल्याची शपथ घेतली. लहान मुले सहज शिव्या वापरतात; मात्र त्यातून शिस्त, संस्कार आणि सामाजिक वातावरण बिघडते. या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सायली गावडे, ग्रामपंचायत सदस्य संजना गावडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com