न्हावेलीत मोफत नेत्र, ह्रदयरोग चिकित्सा

न्हावेलीत मोफत नेत्र, ह्रदयरोग चिकित्सा

Published on

swt126.jpg
30400
न्हावेली ः आरोग्य शिबिरात डॉक्टरांचे स्वागत करताना सरपंच अष्टविनायक धाऊसकर. सोबत उपसरपंच अक्षय पार्सेकर व मान्यवर.

न्हावेलीत मोफत नेत्र, हृदयरोग चिकित्सा
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ः ‘महात्मा फुले’ योजनेअंतर्गत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १२ ः न्हावेली येथे भव्य नेत्र आणि हृदयरोग तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. न्हावेली ग्रामपंचायत, डॉ. राणे हॉस्पिटल आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय यांच्यावतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अक्षय पार्सेकर, तज्ज्ञ डॉक्टर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची शुगर, रक्तदाब आणि ईसीजी तपासणी करुन मोफत वैद्यकीय सल्ला दिला. तसेच अत्याधुनिक मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
या योजनेंतर्गत डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि ह्रदयरोगाशी संबधित एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी या सुविधा पात्र रुग्णांना मोफत मिळणार आहेत. सरपंच धाऊसकर यांनी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. उपसरपंच पार्सेकर यांनी सहभागी संस्थांचे आभार मानले.
या शिबिरात रुग्णांना पुढील उपचारांसाठी २० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून माफक दरात चष्मे वाटप आणि मोफत आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी आणि आरोग्य पथकाने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com