१९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा १९ मार्चला
‘कुवारबाव ब्राह्मणसभा’; सिद्धिविनायक मंदिरातून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ही यात्रा उत्साहात काढण्यात येणार आहे.
ही स्वागतयात्रा सिद्धिविनायक मंदिर, गणेशनगर (कुवारबाव) येथून प्रारंभ होणार आहे. पुढे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) समोरील काजरघाटी धारेवरून सुपलवाडी-गोडाऊन स्टॉप-नवलाई मंदिरमार्गे मार्गक्रमण करत ‘श्रीमान यशवंत हरी गोखले भवन’ येथे येऊन यात्रेची सांगता होणार आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या यात्रेत सभासद, महिला, युवक तसेच कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या यात्रेत सहभागी होताना दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांसह सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करावे आणि समाजात एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

