

rat१२p२.jpg-
P२६O३०३६१
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहकपेठेच्या कार्यक्रमात नीलेश सांबरे यांचा सत्कार करताना प्राची शिंदे. सोबत नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, डॉ. श्रीरंग कद्रेकर, महेंद्र मांडवकर, केदार चव्हाण आदी.
-----
महिलांच्या स्वावलंबनासाठी पुढाकार
नीलेश सांबरे ः गावोगावी स्वयंरोजगार केंद्र उभारणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : गेली १७ वर्षे प्राची शिंदे या रत्नागिरी जिल्ह्यात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने कार्य करत असून, त्यांच्या या उपक्रमाला राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचे सहकार्य असल्याची माहिती जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी दिली. तुम्ही सांगाल त्या गावात किंवा वाडीत स्वयंरोजगार केंद्र सुरू करू तसेच उद्योगिनींना मुंबई व ठाणे येथे बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
रत्नागिरी ग्राहकपेठच्या प्रदर्शनाला जयेश मंगल कार्यालयात भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिजाऊचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. महेंद्र मांडवकर, जिजाऊ संस्थेचे केदार चव्हाण आणि प्राची शिंदे आदी उपस्थित होते.
जिजाऊ संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अगरबत्ती, साबण निर्मितीपासून ते मोफत शिवणकला प्रशिक्षणापर्यंत विविध उपक्रमांद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे पती आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांसोबत महिलाही उत्पन्नाचे साधन निर्माण करून कुटुंबाला हातभार लावत असल्याचे सांबरे म्हणाले.
कोकणातील गरीब विद्यार्थ्यांसाठी पाचही जिल्ह्यांत सीबीएसई शाळा उभारण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. तसेच आयएएस, आयपीएस अधिकारी घडावेत यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी किमान दहा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत अव्वल यावेत, असे ध्येय जिजाऊ प्रतिष्ठानने ठेवले असून कोकण समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.