अॅड. दीपक पटवर्धन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

अॅड. दीपक पटवर्धन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Published on

‘सहकार स्वरूपा’चे मंगळवारी प्रकाशन
अॅड. दीपक पटवर्धन लिखित पुस्तक; रत्नागिरीत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी (ता. १७) होणार आहे. चतुरस्र वक्ते उदय निरगुडकर यांच्या हस्ते सायंकाळी ६.१५ वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
संस्थात्मक जीवनातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तकाचे शब्दांकन प्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला यांनी केले असून राजहंस प्रकाशन (पुणे) यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकात सहकार क्षेत्रातील कार्य, संस्थात्मक प्रवास तसेच सामाजिक क्षेत्रातील अनुभव यांचा आढावा मांडण्यात आला आहे.
अॅड. पटवर्धन यांचे अनुभव कथन मुख्यतः सार्वजनिक जीवनात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आहे. जिद्दीचा आधार घेऊन नेकीनं व नेटानं प्रयत्न केले तर समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता येऊ शकते, हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी हे अनुभवकथन आहे. नगर वाचनालय आणि सहकार क्षेत्रात केलेले कार्य या पुस्तकातून समोर आणले आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्यावतीने करण्यात आले आहे. पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com