''पोक्सो'' कायद्यावर मार्गदर्शन
कोळंबे हायस्कूलमध्ये
‘पोक्सो’वर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः संगमेश्वर तालुक्यातील क. पां. मुळ्ये हायस्कूल, कोळंबे येथे शालेय विद्यार्थिनींसाठी ‘महिला सुरक्षा’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोळंबे हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या महिला पदाधिकारी कुष्टे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी पोक्सो कायदा आणि शालेयस्तरावरील आयसीसी कमिटीचे महत्त्व सांगितले. संकटात घाबरून न जाता कायदेशीर मार्गांचा अवलंब कसा करावा आणि स्वत:ला अपडेट व सजग कसे ठेवावे, याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, महिला सरचिटणीस नुपुरा मुळ्ये, देवरूख शहराध्यक्षा शीतल पंडित, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, रत्नागिरी मध्य मंडळ सरचिटणीस राजेश आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या शिक्षिका सीमा मुळ्ये, फराकटे, जोशी व अन्य शिक्षक कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सुरक्षित समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

