

swt1213.jpg
30420
तळवणे ः येथील रस्त्याचे काम गेली दोन वर्षे अर्धवट स्थितीत आहे.
तळवणेत रस्ता काम दोन वर्षे ठप्प
ग्रामस्थांना त्रास: दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १२ : सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील मुख्य रस्ता ते झंजीरवाडी या ४०० मीटर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. संबंधित विभाग आणि ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे हे काम अर्धवट स्थितीत असून, याचा मोठा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांचे सहकार्य असूनही प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
या रस्त्यापुढील भागात भटवाडी असून, येथील ग्रामस्थांनाही या अर्धवट रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. रात्री-अपरात्री कामावरून ये-जा करणाऱ्यांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. "एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का0" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शासन ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करत आहे; मात्र तळवणे येथील हा रस्ता आजही खडीकरण आणि डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्षांपूर्वी या ४०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती आणि ठेकेदाराला कामही देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात काम अद्याप अधांतरीच आहे. या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व ठेकेदाराकडे वारंवार विचारणा केली, परंतु "आज करतो, उद्या करतो" अशीच उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. येथील जमीन मालक आणि स्थानिक रहिवासी कामासाठी पूर्ण सहकार्य करत असतानाही काम का रखडले आहे, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
........................
चौकट
स्थानिक ग्रामस्थांचा
आंदोलनाचा इशारा
संबंधित विभागाने हे प्रलंबित काम लवकरात लवकर सुरू करून ग्रामस्थांचा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे. जर हे काम तातडीने सुरू झाले नाही, तर आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा तळवणेवासीयांनी दिला आहे.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.