-हेरंब लोंढेने केली संभाव्य लघुग्रहाची नोंद
-rat१२p५.jpg-
२६O३०४४४
हेरंब लोंढे
---
(दोन कॉलमध्ये घ्या)
हेरंब लोंढे याचा लघुग्रह शोध
रोटरी स्कूलचा विद्यार्थी ;दुर्बिणीतून प्रतिमांच्या अभ्यासातून यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः खेड तालुक्यातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सातवीतील हेरंब लोंढे याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘अस्टेरॉइड सर्च कॅम्पेन’मध्ये (Asteroid Search Campaign) सहभागी होत अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवकाशातील दुर्बिणीतून प्राप्त झालेल्या प्रतिमांचा अभ्यास करताना हेरंबने हालचाल करणाऱ्या एका संभाव्य लघुग्रहाची अस्टेरॉइड कॅन्डिडेटची (Asteroid Candidate) नोंद केली आहे.
हेरंबने केलेले हे निरीक्षण एल. हेरम्ब या निरीक्षण कोडसह प्रिलिमीनरी अस्टेरॉईड डिटेक्शन म्हणून नोंदवण्यात आले आहे. या निरीक्षणाची पुढील वैज्ञानिक पडताळणी मायनर प्लॅनेट सेंटरतर्फे सुरू असून, ही संस्था इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनअंतर्गत कार्यरत आहे. जगभरातील लघुग्रह शोधांची अधिकृत नोंद ठेवण्याचे काम ही संस्था करते. हेरंबचे वडील डॉ. मुकुंद लोंढे आणि आई डॉ. रेणू लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. कुटुंबाकडून मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ हेरंबला लाभत आहे. या यशामध्ये एसरोमैजिका या संस्थेचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

