

-rat१२p८.jpg-
२६O३०४५८
चिपळूण ः प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना सभापती सूर्यकांत खेतले. शेजारी मान्यवर
------
प्लास्टिक निर्मुलन, सांडपाणी व्यवस्थापन करा
सूर्यकांत खेतले ः चिपळुणात अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता दिसते; परंतु आरोग्यास धोकादायक असलेला प्लास्टिकचा वापर थांबलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सरपंच, सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थांनी स्वतःच्या कुटुंबापासून प्लास्टिक निर्मूलन आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन मोहीम राबवल्यास आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होईल, असे प्रतिपादन सभापती सूर्यकांत खेतले यांनी येथे केले.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक व्यवस्थापन आणि महिला गाळ व्यवस्थापनाविषयी तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर झाले. विस्तार अधिकारी भास्कर कांबळे यांनी प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला
गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील म्हणाल्या, तालुक्यात सर्वत्र स्वच्छता असली तरी प्लास्टिकचा वापर अद्याप थांबलेला नाही. गावोगावी प्लास्टिकबंदीचे ठराव झाले. अनेक बाबतीत प्लास्टिकचा वापर अनिवार्य असला तरी योग्य प्रकारे प्लास्टिकचे निर्मूलन केल्यास मोहिमेस यश येईल. सभापती सूर्यकांत खेतले म्हणाले, आजच्या आधुनिक जीवनात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. पिशव्या, बाटल्या, कप, पॅकेट्स अशा अनेक वस्तू प्लॅस्टिकपासून तयार होतात; पण हे प्लास्टिक सहज नष्ट होत नाही म्हणून आपण सर्वांनी प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे, हे अत्यंत आवश्यक आहे.
याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापन हा देखील महत्त्वाचा विषय आहे. घरातील आणि गावातील वापरलेले पाणी जर योग्य पद्धतीने व्यवस्थापित केले नाही तर ते रस्त्यावर साचते. त्यामुळे डास वाढतात आणि मलेरिया, डेंगीसारखे आजार पसरतात. सांडपाण्याचे योग्य नियोजन केल्यास ते शेतीसाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी वापरता येते. गावात नाले, सोकपिट, फिल्टर चेंबरसारख्या उपाययोजना केल्यास सांडपाण्याचा त्रास कमी होऊ शकतो, असे खेतले यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपसभापती संदेश आयरे, सदस्य विनोद झगडे, शरद शिगवण, गौरव पाटेकर, सुभाष जाधव, पूजा जवरत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळकर, स्वच्छ भारत मिशनच्या आदिती शिंदे, ऋतुजा राजेशिर्के, विनया लाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.