बागायतदारांच्या मोर्चाला वेंगुर्लेत व्यापाऱ्यांचा पाठिंबा

बागायतदारांच्या मोर्चाला वेंगुर्लेत व्यापाऱ्यांचा पाठिंबा
Published on

swt1225.jpg
30504
वेंगुर्ले ः बागायतदार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.

बागायतदारांच्या मोर्चाला
वेंगुर्लेत व्यापाऱ्यांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः आंबा, काजू बागायतदार आणि व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी आज ओरोस येथे काढण्यात आलेल्या मोर्चाला वेंगुर्ले शहरातून पाठिंबा देण्यात आला.
वेंगुर्लेतील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवली, तर अत्यावश्यक सेवांसहित काही फळे, फुले तसेच पालेभाजी यांची दुकाने सुरू होती. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीड रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरातील मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वेंगुर्ले शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या मोर्चाला पाठिंबा दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com