शक्तीपीठ तात्काळ रद्द करा

शक्तीपीठ तात्काळ रद्द करा

Published on

swt13.jpg
30566
सिंधुदुर्गनगरी: येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना शक्तिपीठ विरोधाचे निवेदन देताना राजू शेट्टी, गिरीश फोंडे, सतीश लळीत, वैभव नाईक आदी.

शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करा
सिंधुदुर्ग संघर्ष समितीची मागणी; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३: पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) या ८०२ किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गामुळे कोकणच्या निसर्गाचा आणि शेतीचा मोठा विध्वंस होणार असून, हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती
धोडमिसे यांना देण्यात आले.
यावेळी राजू शेट्टी, गिरीश फोंडे, सतीश लळीत, माजी आमदार वैभव नाईक, एम. के. गावडे, प्रकाश पाटील, किशोर ढगे, शिवाजी कांबळे, युवराज शेटे, तानाजी भोसले, काका ढोके, राजेंद्र गड्ड्यांवर उपस्थित होते.
निवेदनात म्हटलं आहे की, शक्तीपीठ महामार्ग आणि दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येणार आहे. पश्चिम घाट संवर्धनासाठी नेमलेल्या या आयोगाने हा भाग ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील’ घोषित केला असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. वाघांसारख्या अनेक वन्यप्राण्यांच्या अधिवासावर या प्रकल्पामुळे गदा येणार आहे.

चौकट
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात
हा महामार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक स्थळांच्या जवळून जात आहे. त्यामुळे कोकणच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीने हा महामार्ग रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते;मात्र, निवडणूक संपताच सरकारने आपला शब्द फिरवून महामार्गाचे काम रेटण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

चौकट
समांतर महामार्गाची गरज काय?
रत्नागिरी-नागपूर हा पर्याय महामार्ग आधीच अस्तित्वात असताना पुन्हा समांतर महामार्गाची गरज काय? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कोकणच्या विकासासाठी आम्ही तयार आहोत, पण उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणि निसर्गाची लूट करण्यासाठी लादले जाणारे प्रकल्प सहन केले जाणार नाहीत. हा महामार्ग रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यातून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com