राज्य बास्केटबॉलसाठी १६ ला निवड चाचणी
राज्य बास्केटबॉलसाठी
१६ ला निवड चाचणी
मालवण, ता. १२ : राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे ७६ व्या ज्युनिअर राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत मिनाताई ठाकरे स्टेडियम (आसगाव नाका), नाशिक येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले व मुलींचे दोन संघ सहभागी होणार आहेत.
मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने १६ ला सायंकाळी ४ वाजता निवड चाचणी आयोजित केली आहे. ही चाचणी डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल, वायरी (मालवण) येथील बास्केटबॉल कोर्टवर होईल.निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी मूळ जन्मदाखला, आधारकार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पात्र बास्केटबॉल खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

