चौके मांडखोल शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश

चौके मांडखोल शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश

Published on

चौके मांडखोल शाळेचे
स्पर्धा परीक्षेत यश
ओरोस, ता. १३:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल या शाळेने एस. टी. एस. आणि बी. डी. एस. या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. एस. टी. एस. परीक्षेत ५ विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे. केतन चव्हाणला सुवर्णपदक, स्वराली ढवणला रौप्यपदक तर गौरांग सर्वेकर, शर्वरी गावडे, यश मेस्त्री यांनी कांस्यपदक मिळविले. गुणवत्ता यादीत सोहम गावडे, सान्वी शिंदे, आराध्या गायकवाड आणि गौरवी चव्हाण यांनीही यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बी.डी.एस. परीक्षेत ४ विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. यात प्रामुख्याने केतन चव्हाण, गौरांग सर्वेकर, स्वराली ढवण, तनम खांडेकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दीपक गोसावी, शिक्षक सुषण ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com