नेमळे हायस्कूलसमोर गतिरोधक बसवले
swt134.jpg
30656
नेमळे : येथील हायस्कूलसमोर उभारण्यात आलेले गतिरोधक.
नेमळे हायस्कूलसमोर
गतिरोधक बसवले
सुरक्षेसाठी उपाय: मागणीची पूर्तता
सावंतवाडी, ता.१३: नेमळे हायस्कूलसमोरील महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक तसेच इतर वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्यात आले आहेत.
नेमळे हायस्कूल महामार्गालगत असल्याने शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कळीचा बनला होता. या मार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी गतिरोधक असणे अत्यंत आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी शिक्षक, पालक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी पाठपुरावा करून या महामार्गावर गतिरोधक बसवून दिले.
या महत्त्वपूर्ण कामासाठी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच भारतीय जनता पक्षातर्फे नेमळे शाखा यांनी देखील विशेष पुढाकार घेऊन सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशालेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या वतीने संदीप गावडे, गौरव मुळीक व भाजप नेमळे शाखा यांचे आभार मानण्यात आले. या गतिरोधकांमुळे आता वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार असून विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

