

swt137.jpg
30571
वायरी भूतनाथ : येथे एनएमएमएस परीक्षेत यश मिळवलेल्या अन्विती चव्हाण आणि सुकन्या लोके यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षक प्रवीण कुबल व मान्यवर.
रेकोबा हायस्कूलच्या मुलींचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
मालवण, ता. १२ : राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित श्री रेकोबा हायस्कूल वायरी-भूतनाथ येथील आठवीच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश मिळवले.
यात अन्विती चव्हाण हिने ८१ गुण, तर सुकन्या लोके हिने ८० गुण मिळवून यश मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांची ''सारथी'' योजनेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थी-पालकांच्या परिश्रमाचा ठसा उमटला आहे. शिक्षकांनी आखून दिलेले अभ्यासाचे नियोजन, विशेष मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या आणि विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास यांच्या योग्य ताळमेळामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक प्रवीण कुबल यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संजय खोचरे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.