फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये चेअरमन प्राईज, शिष्यवृत्तीचे वितरण

फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये चेअरमन प्राईज, शिष्यवृत्तीचे वितरण
Published on

आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना नऊ लाखांची शिष्यवृत्ती
‘फिनोलेक्स अॅकॅडमी’ ; अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत मदिहा कोंडकरी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ‘चेअरमन प्राईज’ (अध्यक्षीय बक्षीस) व स्व. श्रीमती मोहिनी छाब्रिया अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना होप फाउंडेशन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नऊ लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. अभियांत्रिकीमध्ये सर्वप्रथम प्रथम वर्ष येण्यासाठी ‘चेअरमन प्राईज’ मदिहा कोंडकरी हिने पटकावले. प्रत्येक शाखेतून प्रथम येण्यासाठी दिला जाणारा स्व. श्रीमती मोहिनी छाब्रिया अॅवॉर्ड कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग शाखेतून दिशा जोशी, इलेक्ट्रिकल शाखेतून शुभम गिताये, मेकॅनिकल शाखेतून मिसबाह काझी, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी शाखेतून रिझा धामस्कर, केमिकल शाखेतून श्रावणी मडके, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशनमधून तनया नरसुले व मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन शाखेतून प्रणय चव्हाण याना प्रदान करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग शाखेतील द्वितीय क्रमांक पूर्वा अगीने, देवदत्त पोखरणकर तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक श्वेता येणाजी, पाचवा क्रमांक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील जयेश पर्टे यांना गौरवण्यात आले. प्राची बघेल, श्रीया गोळवणकर, सुजल खेडेकर, अब्दुल मोंगल या विद्यार्थ्यांना होप फाउंडेशन शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. ३४ होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. २०२५-२६ वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून शुभंकर सावंत व प्राची बघेल यांना गौरवण्यात आले. सर्वोत्तम विद्यार्थ्यांचे पारितोषिक गिरीप्रसाद के. याने पटकावले.
आयएसटीई ग्लोबल टेककॉन २०२६ मध्ये उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल श्रावणी जोशी, माधव सावंत यांचा गौरव करण्यात आला. एनपीटीईएलच्या प्रोग्रामिंग इन जावा या ऑनलाइन अभ्यासक्रमात अव्वल २ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवल्याबद्दल रिफात सोलकर याचा सत्कार करण्यात आला. शरिक सोलकर याला प्रोग्रामिंग इन जावा आणि डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम युझिंग जावा या एनपीटीईएल अभ्यासक्रमांमध्ये अव्वल ५ टक्के मध्ये स्थान मिळवून विशेष यश संपादन केल्याबद्दल गौरवण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयासाठी कास्यपदक मिळवल्याबद्दल तसेच लोकांकिका स्पर्धेत ज्युरी चॉइस अभिनय पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवल्याबद्दल प्रसाद फडके याला गौरवण्यात आले. पार्थ परांजपे याने ५८व्या युवा महोत्सवात इन्स्ट्रुमेंटल स्वरवाद्य प्रकारात विद्यापिठात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कार मिळवल्याबद्दल नाट्यचमूला गौरवले. गायत्री शिंदे हिला पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीत ‘अभिनय उत्कृष्टता पुरस्कार’ मिळाल्याबद्दल गौरवले.
-------
प्राध्यापकांचाही सन्मान
पीएच.डी.बद्दल डॉ. सौरभ आठल्ये, पेटंट मिळाल्याबद्दल डॉ. विनायक भराडी, डॉ.योगेश गजमल, प्रा. आतिया काझी, डॉ.शशिकांत गोईलकर डॉ. सुहासिनी गोईलकर, डॉ. जयंत माने, डॉ. संदीप चावडा, प्रा. मिलिंदकुमार तगारे, प्रा. सुधीर वामने, डॉ. असवंत कुमार शर्मा व प्रा. डी राजेशकुमार यांना गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com