देवरुख महाविद्यालयात वाचन कक्षाची निर्मिती
- rat13p3.jpg
26O30594
साखरपा : अलका भोसले यांचा सन्मान करताना संस्था पदाधिकारी.
देवरूख महाविद्यालयात वाचनकक्ष
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १३ : देवरूख येथील आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात नवीन वाचनकक्ष सुरू करण्यात आला असून, या कक्षाला स्व. ललिता सावळाराम भोसले वाचन कक्ष असे नामकरण करण्यात आले आहे. या कक्षाच्या निर्मितीसाठी भोसले कुटुंबीयांनी उदार देणगी दिली आहे.
स्व. ललिता सावळाराम भोसले यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा आणि त्यांची आठवण कायम राहावी, या उद्देशाने त्यांचे कुटुंबीय कृष्णकुमार भोसले आणि कीर्ती भोसले यांनी विद्यार्थ्यांसाठी हा वाचनकक्ष सुरू केला आहे. अभ्यास, वाचन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असा हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन कृष्णकुमार भोसले यांच्या मातोश्री अलकाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भोसले कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, ग्रंथपाल सुभाष मायंगडे तसेच कृष्णकुमार भोसले यांचे बंधू प्राचार्य डॉ. शशिकांत चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सदानंद भागवत यांनी भोसले कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. हा वाचनकक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

