सावंतवाडीत १६ ला फार्मा अन्वेषण कार्यक्रम

सावंतवाडीत १६ ला फार्मा अन्वेषण कार्यक्रम

Published on

wt1317.jpg
30627
आदिती कारे - पाणंदीकर, हिमांक नार्वेकर

सावंतवाडीत १६ ला फार्मा अन्वेषण कार्यक्रम
दिगज्यांची उपस्थिती: संशोधन कार्याला पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१३ :फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे १६ ला आयोजित केला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
फार्मसी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संशोधन कार्याला पाठिंबा देण्यासाठी व त्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ''पीसीआय''ने हा उपक्रम सुरू केला आहे.देशातील फार्मास्युटिकल शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त ''राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन'' साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पीसीआयने यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची निवड केली आहे. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश फार्मसी क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींच्या सहभागामुळे पेटंट व त्यांच्या व्यापारीकरणासंबंधीची तांत्रिक माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमात अखिल भारतीय केमिस्ट व ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जशूभाई चौधरी, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या संचालिका डॉ. श्वेता देसाई, अन्न व औषध प्रशासन (रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभाग) सहआयुक्त शशिकांत यादव, पीसीआय सदस्य विजय पाटील, इंडोको रेमेडीजच्या व्यवस्थापकीय संचालक आदिती कारे-पाणंदीकर, वर्गो फार्माचे संशोधन प्रमुख हिमांक नार्वेकर, गोवा स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष राज वैद्य, गोवा पीसीआय सदस्य रत्नदीप कुडतरकर यांच्यासह कोकण विभागातील अन्न व औषध विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र व गोवा राज्यातील फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी फार्मसीचे विद्यार्थी आपले पेटंट्स व संशोधन प्रबंध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसमोर मांडणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. या माध्यमातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संवाद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com