देवगड येथे २२ ला विविध कार्यक्रम

देवगड येथे २२ ला विविध कार्यक्रम

Published on

देवगड येथे २२ ला
विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ : येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त येत्या २२ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील महिलांना त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा मिळावा व त्यांच्या कलागुणांना, सुप्त आशा आकांक्षांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयामार्फत २२ ला नगरपंचायत वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम होणार आहेत. यासाठी पाककला स्पर्धा, आरोग्य विषयक, महिलांसबधित विविध योजना व कायदेविषयी मार्गदर्शन तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील जास्तीत जास्त मुली व महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आयोजित कार्यक्रमास प्रतिसाद देण्याचे आवाहन नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com