राजापुरातील प्रभाग नऊमधील विकासकामांसाठी निधी

राजापुरातील प्रभाग नऊमधील विकासकामांसाठी निधी

Published on

राजापुरात प्रभाग नऊमधील
विकासकामांसाठी निधी
राजापूर, ता. १३ ः राजापूर पालिकेचे प्रभाग ९ चे नगरसेवक व बांधकाम सभापती सुबोध पवार यांनी प्रभागातील विविध १४ महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी तत्काळ निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. त्यामुळे प्रभाग ९ मधील विकासकामे मार्गी लागणार आहेत.
पवार यांनी निधीची मागणी केलेल्या कामांमध्ये प्रभाग ९ मधील धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता कुळी घर ते निशाण घाटीरस्ता रूंदीकरण, मजबुतीकरण डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्याला पथदिवे बसवणे व सुशोभीकरण करणे, गुजराळी शाळा अंगणवाडी नवीन इमारत बांधकाम करणे, पूर्ण प्राथमिक शाळा गुजराळी इमारत दुरूस्त करणे, बागकाझी रस्ता पथदिवे बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांना निधी मंजूर करून ही कामे मार्गी लावण्याची ग्वाही आमदार सामंत यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com