-खेडमधील उपहारगृहात चुलीवर जेवण

-खेडमधील उपहारगृहात चुलीवर जेवण

Published on

-rat१३p२१.jpg-
२६O३०६४५
बसस्थानकासमोरील विजय उपाहारगृह या हॉटेलमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे पेटवण्यात आलेली चूल.
-rat१३p२२.jpg-
२६O३०६४६
सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांनी सिलिंडर गोदामाजवळ केलेली गर्दी.
-------
खेडमधील उपाहारगृहात चुलीचा धूर
आखाती युद्धाचा परिणाम; व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून, त्यांना रोजच्या व्यवसायासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खेड शहरात असणाऱ्या उपाहारगृहात या समस्येवर मात करण्यासाठी चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या व्यावसायिक वापरासाठी लागणारे गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेलचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रोजच्या ग्राहकांसाठी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही हॉटेलचालक पर्यायी उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. खेड शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने मालकाने पारंपरिक पद्धतीचा आधार घेत चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आहे.
----
लग्नसराईतील जेवणावळींना फटका
सध्या राज्यात लग्नसराईचा हंगामही सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते; मात्र गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्यास लग्नसमारंभाच्या कार्यक्रमांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com