पिंपळेश्वर स्ट्रायकर्स'' संघ विजयी

पिंपळेश्वर स्ट्रायकर्स'' संघ विजयी
Published on

swt1322.jpg
30688
बांदा: येथील देऊळवाडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेता ''पिंपळेश्वर स्ट्रायकर्स'' संघ मान्यवरांसोबत.

‘पिंपळेश्वर स्ट्रायकर्स’ संघ विजयी
क्रिकेट स्पर्धा: बांदा येथे माऊली वॉरियर्स'' संघ उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता.१३: येथील देऊळवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘पिंपळेश्वर स्ट्रायकर्स’ संघाने अंतिम सामन्यात ‘श्री स्वामी समर्थ माऊली वॉरियर्स’ संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. विजेता व उपविजेता संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, माजी सरपंच दीपक सावंत, माजी उपसभापती शीतल राऊळ, विलास सावंत, प्रसाद गायतोंडे, आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, धनश्री धारगळकर, सावी सावंत, सानिया सावंत, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सुनील माजगावकर, जया धारगळकर आदी उपस्थित होते.
विजेता पिंपळेश्वर स्ट्रायकर्स संघाचे संघमालक विठ्ठल मुळ्ये व दादा साळगावकर यांनी मान्यवरांच्या हस्ते चषक स्वीकारला, तर उपविजेता श्री स्वामी समर्थ माऊली वॉरियर्सचे संघमालक विराज परब व आबा धारगळकर यांनी चषक स्वीकारला. यावेळी अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये मॅन ऑफ द सीरिज- गौरांग साळगावकर, उत्कृष्ट फलंदाज- आशिष सावंत, उत्कृष्ट गोलंदाज- आकाश बांदेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- भाई म्हाडगूत, इमर्जिंग खेळाडू- वल्भेष धारगळकर, स्टायलिश खेळाडू- देवेश वारंग आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून समीर सावंत यांना गौरविण्यात आले. तसेच अनेक रोख पारितोषिकेही यावेळी देण्यात आली. सूत्रसंचालन राकेश परब व सावळाराम शिरोडकर यांनी केले, तर आभार स्वप्निल सावंत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com