’सावंतवाडी‘ रस्त्यांसाठी 25 कोटी

’सावंतवाडी‘ रस्त्यांसाठी 25 कोटी
Published on

सावंतवाडतील रस्त्यांसाठी २५ कोटी
विधानसभा मतदार संघातील कामे; आमदार केसरकर यांचा पाठपुरावा
वेंगुर्ले, ता.१३ :राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार सावंतवाडी मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गांच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील वर्दळीच्या १४ प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
यात सावंतवाडी-आरोंदा-रेडी रस्ता: गॅबियन वॉल बांधण्यासाठी १ कोटी व लहान पुलासह डांबरीकरणासाठी १ कोटी ५० लाख, झाराप-आकेरी-कोलगाव-सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग: रस्ता सुधारणा व डांबरीकरणासाठी १ कोटी ७५ लाख, कनेडी-कुपवडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दाणोली-बांदा: सुधारणा व डांबरीकरणासाठी २ कोटी, वेंगुर्ला-बेळगाव रस्ता: लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ७५ लाख, मडुरा-सातोसे-किनळे-कवठणी रस्ता: सुधारणा व डांबरीकरणासाठी २ कोटी,आंबोली-चौकूळ-तेरवण रस्ता (प्र.जि.मा.): सुधारणा व डांबरीकरणासाठी १ कोटी, शेर्ला-कास रस्ता: सुधारणा व डांबरीकरणासाठी ८५ लाख, म्हापण ते दाभोली: सुधारणा व डांबरीकरणासाठी २ कोटी, वेंगुर्ला टांक ते सागरतीर्थ रस्ता: सुधारणा व डांबरीकरणासाठी ३ कोटी, वेंगुर्ला-तुळस-सावंतवाडी रस्ता: डांबरीकरण, मोरीची पुनर्बांधणी व संरक्षक भिंतीसाठी १ कोटी, शिरोडा-रेडी-तेरेखोल रस्ता: सुधारणा व डांबरीकरणासाठी १ कोटी, साटेली भेडशी ते खानयाळे रस्ता: खडीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी ५० लाख, मांगेली देऊळवाडी रस्ता: खडीकरण व डांबरीकरणासाठी २ कोटी ५० लाख, तिलारी धरण परिसर रस्ता: खडीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी, वझरे-तळेखोल-विर्डी पूल: पुलाच्या कामासाठी १ कोटी १५ लाख आदी कामांचा समावेश आहे.
हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com