कृष्णज्योत अभ्यासिकेचा ९ हजार जणांना लाभ
अभ्यासासाठी ‘कृष्णज्योत’चा आधार
अजित राणे ः नऊ हजार विद्यार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : वाढत्या शहरीकरणामुळे अभ्यासाकरिता शांत वातावरणाची जागा अनेकदा मिळत नाही. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध व्यावसायिक परीक्षा देणाऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन कृष्णज्योत अभ्यासिका सुरू झाली. गेल्या वर्षभरात या अभ्यासिकेचा लाभ नऊ हजार जणांनी घेतला आहे. शहरात अशा प्रकारे आणखी अभ्यासिका सुरू करण्याचा मानस अभ्यासिकेचे संचालक अजित राणे यांनी ‘सकाळ’ला दिली.
अभ्यासिकेचा पहिला वर्धापनदिन नुकताच झाला. मारुती मंदिर येथील केएसपी अलेक्सा इमारतीमध्ये गेल्या वर्षी राणे यांनी आई- वडिलांच्या नावे कृष्णज्योत अभ्यासिका सुरू केली. येथे एकाच वेळी ३९ व्यक्ती अभ्यास करू शकतात. प्रत्येकाला स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. दहावी, बारावीपासून अगदी जेईई, नीट, सीए, जिल्हा परिषद, बॅंकिंग परीक्षा, एमपीएससी, युपीएससी परीक्षा तसेच अभियांत्रिकी परीक्षा देणारे विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.
अभ्यासिकेत वायफाय, एसी, स्वतंत्र टेबल, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग पॉईंट, सीसीटीव्ही, इन्व्हर्टर बॅकअप, मुली, महिलांसाठी राखीव जागा, शैक्षणिक साहित्यासाठी लॉकर सुविधा दिल्या आहेत. सकाळी ८ ते रात्री १० अशी अभ्यासिकेची वेळ आहे. अभ्यासिकेत सुरवातीपासून नियमित अभ्यास करणाऱ्या प्रियांका ताडे यांना नुकताच डर्मिटॉलॉजीकरिता प्रवेश मिळाला आहे. तसेच काही अधिकारीसुद्धा आणि कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा या अभ्यासिकेचा उपयोग करत असल्याचे राणे यांनी नमूद केले.
गेल्या वर्षभरात गणपती, दिवाळी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असो व अन्य कोणत्या सार्वजनिक सण, सुटी असतानाही कृष्णज्योत अभ्यासिकेत विद्यार्थी येत असल्याने एकही सुटी अभ्यासिकेने घेतली नाही. त्यामुळे विनाखंड अभ्यास करता आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

