-कोकणच्या रानमेव्यात करमलांची लज्जत
-rat१४p८.jpg-
P२६O३०७८९
संगमेश्वर ः तालुक्यातील ग्रामीण भागात करमले लगडलेली दिसत आहेत.
-----
आंबटगोड करमलांचा रानमेवा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः निसर्गातील हा रानमेवा चाखण्यासाठी त्याच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. फुले, फळे दृष्टीला दिसून तरी येतात; मात्र न दिसणारा गंध आपल्याला अलगद ओढत नेतो. याच हंगामात येणारी करमलाची फळं, पिकल्यानंतर मस्त आंबटगोड लागतात. कोकणात या फळांचं लोणचं घातले जाते.
करमलं पिकली की, ग्रामीण भागात तो आजही रानमेवा म्हणून चाखला जातो. या करमलांचा अन्य काहीच उपयोग नसला तरी यांच लोणचं घातलं जातं. सुरुवातीला हिरवे असणारे हे फळ पिकल्यानंतर पिवळसर होते. याची चव आंबटगोड असल्याने मुलांना ते अधिक आवडते. चार बाजू पुढे आलेल्या या फळाचा आकारदेखील तसा आकर्षकच असतो. केळीच्या पानावर मीठ आणि तिखट घेऊन झाडाखाली बसून करमलं कापून त्याला तिखट मीठ लावून याचा आस्वाद आजही घेतला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

