आचरा ग्रामपंचायतीतर्फे सभापतींसह इतरांचा सन्मान
30798
आचरा ग्रामपंचायतीतर्फे
सभापतींसह इतरांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १४ ः जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण व उपसभापती घनश्याम झाड यांचा येथे सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातील श्री देव रामेश्र्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, जयप्रकाश परुळेकर, अनिल करंजे, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, योगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर, अनुष्का गावकर, पूर्वा तारी, श्रुती सावंत, सायली सारंग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी.आर.पी., प्रभाग अध्यक्ष व सचिव, ग्रामसंघ अध्यक्ष व सचिव आदी उपस्थित होते. यावेळी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी.आर.पी., प्रभाग अध्यक्ष व सचिव, ग्रामसंघ अध्यक्ष व सचिव यांना सभापती व उपसभापतींच्या हस्ते प्रमाणपत्र व रोपे देऊन सन्मानित केले. यावेळी ‘उमेद’चे प्रभाग समन्वयक मांजरेकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळा गाऊडवाडीचे शिक्षक राजेश भिरवंडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

