भोसले, ॲड. नेवगी यांच्या 
स्मृतीप्रीत्यर्थ विशेष पुरस्कार

भोसले, ॲड. नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विशेष पुरस्कार

Published on

30802
प्रवीण भोसले
30805
शेखर पाडगावकर


भोसले, ॲड. नेवगी यांच्या
स्मृतिप्रीत्यर्थ विशेष पुरस्कार

‘कोमसाप’ ः २० मार्चला वितरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीतर्फे शाखेचे दिवंगत सदस्य प्रा. मिलिंद भोसले आणि ॲड. दीपक नेवगी यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही केली.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कीर्तनकार शेखर पाडगावकर यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावर्षीचा ‘प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला-सांस्कृतिक सेवा पुरस्कार’ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना, तसेच ‘ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार’ कीर्तनकार तथा निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा ‘कोमसाप’चे शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केली. पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (ता. २०) सकाळी १० वाजता मळगाव हायस्कूलच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक दयानंद गवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘कोमसाप’चे अध्यक्ष पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गावस, सदस्य दीनानाथ नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com