

30807
सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
मंगेश तळवणेकर यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः राजे प्रतिष्ठान, कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्यावतीने मंगेश तळवणेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, उच्च न्यायालयातील ॲड. अंजली कुडतरकर, ॲड. अनघा निरवडेकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रेया आडिवरेकर, ॲड. सायली दुभाषी, सामाजिक कार्यकर्त्या निकिता सावंत उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी ‘महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोहळ्याला संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सहसचिव कल्याण कदम, जिल्हा प्रवक्ते डॉ. रमाकांत गावडे, महिला जिल्हाध्यक्ष अंकिता माळकर, जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोन्सुरकर, चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष गजेंद्र कोठावळे, चित्रपट सेना महिला अध्यक्षा प्राजक्ता मोरजकर, जिल्हा तालुकाध्यक्ष संचिता गावडे, सावंतवाडी शहराध्यक्षा सेजल पेडणेकर, उपाध्यक्षा अक्षता कुडतरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अनघा रांगणेकर, सदस्य दीप्ती कोरगावकर, सुनीता भाईप, सुहासिनी शेट्ये, अश्विनी कुडतरकर, दिशा राऊळ, विजया चव्हाण, शीतल माळकर, प्रतिमा माळकर, सुवर्णा माळकर, लक्ष्मी माळकर, दिनेश राऊळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.