कुडाळात शुभेच्छा कार्यक्रम

कुडाळात शुभेच्छा कार्यक्रम

Published on

30818

कुडाळात शुभेच्छा कार्यक्रम
कुडाळ ः येथील एसटी आगाराच्या मैदानावर आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १७) शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन टाळले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, सभापती मिलिंद नाईक, माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नयना मांजरेकर, रोहित गावडे आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता वाढदिवस कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, शिवसेना संपर्कमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत. आमदार राणे व पालकमंत्री राणे हे खासदार राणे यांना अभिप्रेत, असे काम करत आहेत. कुडाळ मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्न विधानसभेत ते मांडत आहेत. आमदार राणे यांचा वाढदिवस आगळावेगळा साजरा करण्यात येणार आहे. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला तर मोठी गर्दी होते आणि विरोधक म्हणतात, सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला गर्दी झाली. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार राणे यांना या दिवशी सायंकाळी व्यासपीठावर जाऊन शुभेच्छा देता येणार आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com