मिलिंद तेंडूलकरांची नर्मदा परिक्रमा पूर्ण
-rat१४p१४.JPG-
P२६O३०८०१
पावस ः नर्मदा परिक्रमा करून परतलेले मिलिंद तेंडुलकर.
----
मिलिंद तेंडुलकर यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः लांजा तालुक्यातील हर्चे येथील रहिवासी आणि स्वामी स्वरूपानंद यांचे निस्सिम भक्त मिलिंद तेंडुलकर यांनी अत्यंत खडतर अशी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या आध्यात्मिक प्रवासानंतर त्यांचे गुरूवारी रत्नागिरीत आगमन झाले आहे. ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर हा तीन महिन्यांचा पायी प्रवास तेंडुलकर यांनी २५ नोव्हेंबर २०२५ला मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून ‘नर्मदे हर’चा जयघोष करत सुरू केला होता. नर्मदेच्या काठाने हजारो किलोमीटरचा प्रवास करत विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. २४ फेब्रुवारीला त्यांनी पुन्हा ओंकारेश्वर येथे पोहोचून परिक्रमेची सांगता केली. तिथे विधीवत पूजन आणि अभिषेक करून त्यांनी या पवित्र व्रताची पूर्णाहुती केली. त्यानंतर ते रत्नागिरीत परतले. रत्नागिरीत आगमन झाल्यानंतर त्यांनी पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

