कोकणातील लोककलांना मिळणार व्यासपीठ

कोकणातील लोककलांना मिळणार व्यासपीठ

Published on

कोकणातील लोककलांना मिळणार व्यासपीठ
दापोलीत २१, २२ला सांस्कृतिक महोत्सव; देवदत्त नागे साधणार रसिकांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ ः कोकणातील समृद्ध संस्कृती, लोककला आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दापोली येथे दापोली सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. कोळथरे येथील (कै.) कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने हा महोत्सव २१ व २२ मार्चला होणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून दापोली परिसरासह संपूर्ण कोकणातील विविध पारंपरिक कला, लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच नवोदित कलाकारांनाही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे उद्‍घाटन २१ मार्चला सायंकाळी ५.३० वा. सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच विधान परिषद आमदार उमा खापरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्‍घाटनानंतर दापोलीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारे काटखेल आणि जाखडी या लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दापोलीतील विविध नामवंत कलाकारांचा सहभाग असलेला भक्तिरंग या संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, वादन, चित्रकला आणि गायन अशा विविध कलांचा अनोखा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. याच दिवशी नागे हे उपस्थित रसिकांशी संवादही साधणार आहेत. २२ मार्चला दिवसभर चित्रकला आणि रांगोळीचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सायंकाळी ‘सूर तेच छेडिता’ हा विशेष संगीत कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, ऋषिकेश रानडे, ढोलकीवादक नीलेश परब तसेच आर्चिस लेले आणि कमलेश भडकमकर यांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com