‘महिला मॅरेथॉन’मध्ये तळेरे विद्यालय प्रथम
30826
‘महिला मॅरेथॉन’मध्ये तळेरे विद्यालय प्रथम
जिल्हास्तरीय स्पर्धा; विजेत्यांचा ‘क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ : येथे आयोजित जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेत येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारली.
येथे प्रथमच श्री फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी निरोम, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे, सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धा व महिला क्रीडारत्न सन्मान सोहळा उत्साहात झाला. येथील वामनराव महाडिक विद्यालय येथे ही स्पर्धा झाली.
स्पर्धेचे उद्घाटन शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते झाले. शाळा समिती सदस्य नीलेश सोरप, तळेरे पोलिसपाटील चंद्रकांत जाधव, औदुंबरनगर पोलिसपाटील श्रेया जंगले, दत्तात्रय माडकर, मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, अध्यक्ष-संस्थापक समीर राऊत, स्पर्धा आयोजन सचिव डॉ. प्रमोद घाडीगावकर, वरळी, मुंबईचे फुटबॉल मार्गदर्शक मनीष भालेकर, क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी, डी. सी. तळेकर, पी. एन. कानेकर, एस. एस. पडवळ, एस. सी. शेट्ये, ए. पी. कोकरे, ए. बी. कानकेकर, एस. यू. सुर्वे, आर. आर. खटावकर, रोहिणी जाधव, ए. एस. गोसावी, आर. जी. तांबे, के. डी. तळेकर, एस. आर. वानोळे, डी. यू. तळेकर, संदेश तळेकर, अंजली गायकवाड (महिला क्रीडा प्रमुख), पालक प्रतिनिधी दीप्ती नारिंगरेकर, प्राची लाड, सुवर्णा जोशी (सचिव), स्वप्नाली बेनकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः १२ वर्षांखालील मुली २ कि.मी. धावणे-हर्षिता तडवी, रुंजी भोगले, रिद्धी कल्याणकर, (वामनराव महाडिक शाळा, तळेरे). १४ वर्षांखालील मुली ३ कि.मी. धावणे-श्रावणी नारिंग्रेकर (श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अकॅडमी), दुर्वा घाडी (तळेरे विद्यालय), आरोही चव्हाण (तळेरे विद्यालय), मुग्धा राऊत (तळेरे विद्यालय.) १७ वर्षांखालील मुली ३ कि.मी. धावणे-वेदिका पवार (शेठ एन. एम. व्ही. खारेपाटण), सिद्धी राऊत (एन. एम. व्ही. खारेपाटण), कस्तुरी सावंत (महाडिक माध्यमिक शाळा तळेरे). महिला खुला गट ः ५ कि.मी. धावणे-रेश्मा पांढरे, ईशा शिरोडकर, दर्शना कुडापकर (तिन्ही श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अकॅडमी). ४५ वर्षांवरील महिला गट ः ५ कि.मी. धावणे-आशा कानकेकर (महाडिक विद्यालय तळेरे). तसेच सावी मुद्राळे, वेदिका तेली, श्रावणी नारिंग्रेकर, रिद्धी कल्याणकर, रुंजी भोगले, हर्षिता तडवी, मुग्धा राऊत, आशा कानकेकर, दर्शना कुडापकर, संध्या गोधोळकर, शरयू पाटील, रुचा चव्हाण, अंजली गायकवाड, प्राची लाड यांचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

