-रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

-रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Published on

-rat१४p१७.jpg-
P२६O३०८३१
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी.
----
ओबीसी जनगणनेसाठी धरणे आंदोलन
भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चाचा एल्गार; टीईटीवरून सरकारवर निशाणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मुख्य मागणीसह युजीसी नियमावली बळकट करणे आणि २०११ पूर्वीच्या शिक्षकांची जाचक टीईटी अट रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या या देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर वामन मेश्राम आणि चौधरी विकास पटेल यांनी केले तर रत्नागिरीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ओबीसी नेते रमेश पाजवे यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘आजवर सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींची केवळ फसवणूक केली आहे. जर आता स्वतंत्र जनगणना झाली नाही तर ओबीसींना खुल्या प्रवर्गात धरले जाईल. खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी स्वतंत्र कॉलममध्ये ओबीसींची गणना होणे, ही काळाची गरज आहे.’
बामसेफचे जिल्हाध्यक्ष समाधान पैठणे यांनी युजीसी नियमावली आणि शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची अट लावणे अन्यायकारक आहे. या शिक्षकांचा अनुभव आणि निकाल उत्तम असताना त्यांच्यावर ही जाचक अट लादली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे. युजीसी नियमावली मजबूत करा आणि टीईटी रद्द करा, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, बामसेफ जिल्हाध्यक्ष समाधान पैठणे, नितीन तळेकर, सलील डाफले, रमेश पाजवे, संजय आयरे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com