राजापूर पालिकेला १५० कोटीचा निधी द्या
राजापूर पालिकेला १५० कोटींचा निधी द्या
आमदार भाई जगताप ः अधिवेशनात मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजापूर पालिकेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त राजापूर शहरविकासासाठी १५० कोटींचा निधी शासनाने द्यावा, अशी मागणी भाई जगताप यांनी अधिवेशनामध्ये केली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्याशी बैठक झाली असून, राजापूर पालिकेला आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
राजापूर पालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुढील वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या संदर्भात काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला. तसेच पालिकेला १५० कोटींचा निधी शासनाने द्यावा, अशी मागणी जगताप यांनी अधिवेशनामध्ये केली. यावर पालकमंत्री सामंत यांनी पालिकेला आवश्यक असणाऱ्या कामांची यादी तयार करण्यात आली असून, त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यात येईल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

