सावंतवाडी सर्वोदयनगर येथे
जागतिक महिला दिन उत्साहात

सावंतवाडी सर्वोदयनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात

Published on

30852

​सावंतवाडी सर्वोदयनगर येथे
जागतिक महिला दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील सर्वोदयनगर रहिवाशांच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका नीलम नाईक यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली.
यावेळी कर्तबगार महिला ऋचा पाटणकर, सुनीता पावसकर, संयोगिता काळुंद्रीकर, सुजल राऊळ आणि सपना पांढरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्वोदयनगर महिला अध्यक्ष दिशा कामत यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या व प्रा. रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या स्पर्धेत अनुश्री राणे, स्वाती दुबळे, रोशनी गावडे, मानसी पिळणकर व दीप्ती बुवा यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. कार्यक्रमाची सांगता अजय गोंधवळे, मेघना राऊळ यांच्या बहारदार गाण्याने झाली. सर्वोदयनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी पारितोषिके पुरस्कृत केली. अमृता धुरी यांनी सूत्रसंचालन केले. अनुश्री राणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com