देवगड ग्रंथालयात आज
मालवणी गायन कार्यक्रम

देवगड ग्रंथालयात आज मालवणी गायन कार्यक्रम

Published on

देवगड ग्रंथालयात आज
मालवणी गायन कार्यक्रम
देवगड, ता. १४ : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालय आणि तालुका पेन्शनर्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता.१५) सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी येथील मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता आणि गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील उमाबाई बर्वे ग्रंथालय आणि तालुका पेन्शनर्स असोशिएशनच्यावतीने ‘मुक्तसंवाद’ या शीर्षकाखाली वर्षभरात दर महिन्याला एक याप्रमाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रम नियोजित केले आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचे पहिले पुष्प श्री. मडकईकर गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन पडेल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दिलीपकुमार फडके यांच्या हस्ते होईल. कार्यक्रम स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालय अध्यक्ष गुरुदेव परुळेकर, देवगड पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com