गडनदी आशिये हद्दीतील गाळ उपसा कामाला प्रारंभ
30871
गडनदी आशिये हद्दीतील
गाळ उपसा कामाला प्रारंभ
कणकवली, ता. १४ : आशिये (ता. कणकवली) गावच्या हद्दीतील गडनदीतील गाळ उपसा कामाचा प्रारंभ आज सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरवर्षी अतिवृष्टी कालावधीत गावातील अनेक घरांना पुराचा फटका बसतो. गाळ उपसा झाल्याने हा धोका कमी होईल, असा विश्वास सरपंच गुरव यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच सदानंद बाणे, जलसंपदा विभाग सहाय्यक अभियंत्या ऐश्वर्या जौंदाळ, उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, अनिल गुरव, सुहास खानोलकर, ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, बाळकृष्ण गुरव, बाळकृष्ण पुजारे, श्रीधर माणगावकर, धोंडू माणगावकर, लवू पुजारे, रत्नाकर गुरव, धोंडू गुरव, नीलेश पुजारे, मनोहर नाईक, ग्रामसेवक राकेश गोवळकर आदी उपस्थित होते. सहाय्यक अभियंत्या जौंदाळ म्हणाल्या, ‘‘जिल्हा नियोजनमधून या कामासाठी निधी मंजूर आहे. जलसंपदा विभागामार्फत गाळ काढला जात आहे. या गाळमुक्त कामामुळे गडनदीचे पात्र अधिक खोल होणार असून, पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात आशिये गावात पूरस्थितीचा धोका कमी होऊन परिसरातील शेती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

