चिपळूणमधील होम मिनिस्टर स्पर्धेत प्रियांका शिंदे प्रथम

चिपळूणमधील होम मिनिस्टर स्पर्धेत प्रियांका शिंदे प्रथम

Published on

होम मिनिस्टर स्पर्धेत प्रियांका शिंदे प्रथम
चिपळूण येथे जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम; पैठणी देऊन महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः चिपळूण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रियांका विनोद शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, मुख्याधिकारी संजय जाधव, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, नगरसेविका नीलम जाधव, नसरीन खडस, कांचन जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, विभाग प्रमुख बापू साडविलकर आदी उपस्थित होते. होम मिनिस्टर स्पर्धेत प्रियांका विनोद शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक्षा प्रवीण हरवडे द्वितीय, अवनी अनिल निमकर तृतीय, तर निलम वैभव जाधव मोहिते आणि निशिगंध विठ्ठल बांदेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्या महिलांना पैठणी, विजेता शिल्ड आणि रोपकुंडी देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील विनायक सातुसे यांनी होम मिनिस्टरचा खेळ रंगविला. उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केले. महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

चौकट
महिलांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मिरा महामुने, पोलीस कर्मचारी वर्षा रहाटे, पोस्टमन अंकिता चांदोरकर, पोस्ट ऑफिस सौम्या जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी संज्योती पालशेतकर, मंडळ अधिकारी दमयंती माने, लिपिक कविता खंदारे, लेखा विभाग मयुरी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरुपा गरुड, आरोग्य सेविका दिपाली चिले, आशा सेविका वर्षा सुर्वे, सफाई कर्मचारी श्रद्धा जाधव व रोशनी मोहिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रेखा चौरे, वरिष्ठ लेखा लिपिक विद्या पेढांबकर यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com