शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार
rat15p4.jpg-
30940
शेनाळे : महसूल समाधान शिबिरात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करताना उपस्थित मान्यवर. तसेच शिबिरात मार्गदर्शन करताना दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी.
शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार
डॉ. विजय सूर्यवंशी ; शेनाळेतील शिबिरात २८३ दाखल्यांचे वितरण
मंडणगड, ता. १५ ः ‘‘सामान्य नागरिकांचे महसूल आणि प्रशासकीय प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे,’’ असे प्रतिपादन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
''छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर'' (टप्पा क्र. १) अंतर्गत म्हाप्रळ महसूल मंडळाचे शिबिर १४ मार्च रोजी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, शेनाळे येथे संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
यावेळी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले की, "राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या संकल्पनेतून प्रशासन आता थेट सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी होत असून, नागरिकांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."
या कार्यक्रमाला तहसीलदार अक्षय ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, वामन मेंढे यांच्यासह वन, आरोग्य, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल यंत्रणा, पोलीस पाटील आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
विविध दाखल्यांचे वाटप
शिबिराच्या माध्यमातून ‘एक खिडकी’ योजनेच्या धर्तीवर नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यात उत्पन्न, रहिवास, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर, ज्येष्ठ नागरिक आदी २८३ दाखले होते. १८ फेरफार नोंदी, १७ सातबारा दुरुस्ती अर्ज अशा महसूली नोंदीचे दाखले होते. १४५ डिजिटल सातबारे, ७८ ''आठ-अ'' उतारे वितरीत केले. तसेच नवीन शिधापत्रिका, आधार कार्ड नोंदणी/दुरुस्ती आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभ दिला गेला. ‘एक खिडकी’ अंतर्गत ४४ अर्ज जागीच निकाली काढण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

