चिपळूण ः महिलांच्या सुमधुर आवाजात चिपळूणकर न्हाले
महिलांच्या सुमधुर आवाजात चिपळूणकर न्हाले
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा उपक्रम ; संगीताची अविस्मरणीय मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वर तरंग’ या महिलांच्या विशेष गायन कार्यक्रमाने चिपळूणकर रसिकांना सुरेल संगीताची अविस्मरणीय मेजवानी दिली. स्थानिक महिलांनी मधुर आवाजात विविध गीते सादर केली.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संगीत शिक्षिका वीणा कुंटे, उत्तरा साडविलकर, मंदा संकपाळ, नाट्य परिषदेच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि खजिनदार ॲड. विभावरी रजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष योगेश बांडागळे आणि संगीत शिक्षक सतीश कुंटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घघाटन झाले. यावेळी विभावरी वाडकर, मानसी शिंदे, अमृता नायर, दीपा ओडल, निकिता सावंत, दीपा गद्रे, मनस्वी राजवाडे, सारिका यादव, सरला शिंदे, स्वाती कार्ले, वीणा परंजपे, अनघा जोशी, मेघना बेहेरे, अदिती तांबे आदींनी विविध गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. तसेच गंधाली ग्रुप यांनी सादर केलेल्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले.
गायनाला हार्मोनियमवर उत्तरा साडविलकर व निकिता सावंत यांनी साथ दिली. तबल्यावर यदुवीर चोगले, श्रुतिका शिगवण आणि शुभ्रा वाघमारे यांनी सुरेल साथ केली, तर साइड रीदमवर आरुश कुडाळकर यांनी प्रभावी साथ दिली. कार्यक्रमातील सहभागी कलाकारांना कोकण गंधर्व राजाभाऊ शंबेकर, डॉ. मिलिंद गोखले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कलाकारांना मेघना गोखले व राहुल साडविलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया पोटे यांच्यासह नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेल वातावरण, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘स्वर तरंग’ ही मैफल संस्मरणीय ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

