खेडमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन

खेडमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन

Published on

खेडमध्ये कोकण विभागीय
विद्रोही मराठी साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ : चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला २० मार्चपासून सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च रोजी शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन संस्था आयोजित संमेलन प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. संमेलनाची संयोजन समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष संजय कासारे, कार्याध्यक्ष रवीउदय जाधव, सचिव मोहिते, असून संजय काशिद, प्रा. बाबासाहेब कांबळे, नेत्रदीप तांबे विठोबा साळवी, मुख्य संघटक मोहन चव्हाण, अरूणकुमार मोरे, बाबाराम पवार, सहकार्यवाह भाऊसाहेब कांबळे, पूनम सालेकर, डी. ए. जाधव, राजेंद्र निकम, समीर पाष्टे, सिकंदर मुसा, सुनील जाधव, मेहबूब मोहिमतुले, जावेद शिरळकर, सदानंद काते, कृष्णा पाटील सहभागी आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध संघटना प्रयत्नशील आहेत. या संमेलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल येसोडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com