दुर्गादेवी तळेकरीण मातेचा १७ रोजी शिंपणोत्सव
rat15p20.JPG-
31032
संगमेश्वरः करजुवे येथे ग्रामदेवता श्री तळेकरीण देवीची पालखी नाचवताना ग्रामस्थ. (छाया ः संतोष नलावडे , रत्नागिरी)
दुर्गादेवी तळेकरीण मातेचा
१७ रोजी शिंपणोत्सव
रत्नागिरी, ता. १५ : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता दुर्गादेवी तळेकरीण मातेचा पुरातन देवस्थान येथील शिंपणोत्सव मंगळवारी (ता. १७) रोजी साजरा होणार आहे.
संपूर्ण गावची पालखी भेट पूर्ण होते आणि पालखी गावातील प्रमुख गुरव यांच्या घरी स्थानापन्न होते. यावेळी गावातील गुरव यांच्याकडून पालखीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर नवस फेडणे, देवीला नवस लावणे हे कार्यक्रम होतात. नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती असल्यामुळे भाविक उपस्थित राहतात. नवस फेडले जातात व नविन नवस लावले जातात. यानंतर देवीची पालखी खुणा काढतात. याप्रसंगी सर्व भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यानंतर जय तळेकरीण नमन नाट्य मंडळ करजुवे डावलवाडी आयोजित तळेकरीण देवीचे बहुरंगी नमन सादर होणार आहे. संत परंपरेने सजलेले गणनाट्य, संत गोरा कुंभार खास आकर्षण, श्री स्वामी समर्थांचे भक्तीमय आगमन, गणेशाचे मनमोहक देखाव्यात पूजन दाखविण्यात येणार आहे. देवीच्या सर्व भाविकांनी उपस्थित राहून शिंपणे उत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी, गावकरी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

