काँग्रेसविरोधात भाजपची चिपळूणात निदर्शने

काँग्रेसविरोधात भाजपची चिपळूणात निदर्शने

Published on

भाजपची चिपळुणात
काँग्रेसविरोधात निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर महत्त्वाची चर्चा सुरू असताना संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी ‘चहा-बिस्कीट पार्टी’ आयोजित केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या चिपळूण शहर मंडलच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
कापसाळ येथील बाळासाहेब माटे सभागृहाच्या बाहेर दुपारी साडेतीन वाजता हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘संसदेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित असताना विरोधकांचे असे वर्तन खेदजनक आणि आक्षेपार्ह आहे,’ अशी टीका या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com