आज पर्यावरण विषयक परिसंवाद
विद्यापीठ उपपरिसरात आज
पर्यावरण विषयक परिसंवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : मुंबई विद्यापीठाच्या येथील चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरातर्फे ‘पर्यावरणीय दृष्टी : शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील एकात्मिक संवाद’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा उद्या (ता. १७) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपपरिसराच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे.
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्यादृष्टीने शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यात संवाद वाढावा, तळागाळातील पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळावी तसेच शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या विविध संकल्पनांवर चर्चा व्हावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि सहभागींत पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, शैक्षणिक संशोधन आणि क्षेत्रीय अभ्यासातून मिळालेली माहिती, उद्योगक्षेत्रातील शाश्वत पद्धतींचे अनुभव तसेच परस्पर संवाद आणि ज्ञानविनिमयाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्योजक दीपक गद्रे, आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक व उद्योजक नंदकुमार पटवर्धन, आशुतोष शेवपुरे, प्रभाकर सडेकर, डॉ. प्रफुल्ल सावंत आणि डॉ. सोनाली शिंदे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

