कोळोशी क्रिकेट लीग स्पर्धेत
''जय हनुमान जानवली'' विजेता

कोळोशी क्रिकेट लीग स्पर्धेत ''जय हनुमान जानवली'' विजेता

Published on

31218

कोळोशी क्रिकेट लीग स्पर्धेत
‘जय हनुमान जानवली’ विजेता

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १६ ः उत्तम इलेव्हन कोळोशी बौद्धवाडी आयोजित भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धेत महापुरुष तिवरे संघावर मात करत जय हनुमान जानवली संघाने चषकावर आपले नाव कोरले. महापुरुष तिवरे संघ उपविजेता ठरला.
बलाढ्य संघांचा भरणा असलेल्या ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. शिरगाव आणि वळीवंडे संघांना उपांत्य फेरीत धूळ चारत जय हनुमान जानवली व महापुरुष तिवरे संघांनी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम सामन्यात अंतिम षटकांत दोन खराब चेंडूंवर मोठे फटके मारत जानवली संघाने चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ तांबे, चारुहास इंदप, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख सुशील इंदप, सुचिता पोकळे, विश्वनाथ कदम, डी. बी. करडे, कृष्णा कदम, दामिनी कदम, उत्तम सावंत, सोमा कदम, उत्तम इलेव्हन कोळोशी बौध्दवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विश्वनाथ कदम यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्तम इलेव्हनचे सर्व खेळाडू, महिला वर्ग व लहान मुलांनीही विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com