संगलट येथे टॉवर ९ महिन्यांपासून बंद
शिंपणे उत्सवामुळे
बाजार मंगळवारी
संगमेश्वर ः संगमेश्वर येथे दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार मंगळवारी भरणार आहे. देवी जाखमाता आणि निनावी देवीचा प्रसिद्ध शिंपणे उत्सव बुधवारी (ता. १८) होणार असल्याने बाजाराच्या दिवशी बदल करण्यात आला आहे. शिंपणे उत्सवानिमित्त संगमेश्वर येथे हजारो भाविक दाखल होणार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संगमेश्वर व्यापारी संघटनेच्यावतीने ग्राहकांनी या बदलास सहकार्य करावे, तसेच मंगळवारी भरणाऱ्या बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
संगलट येथे टॉवर
९ महिन्यांपासून बंद
खेड ः तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील संगलट येथील बीएसएनएल टॉवर गेल्या ९ महिन्यांपासून बंद आहे. यामुळे मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा ग्राहकांना फटका बसत आहे. यामुळे ग्राहकवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संगलट येथील बीएसएनएल टॉवरमुळे पंचक्रोशीतील ग्राहकांना फायदा होतो; मात्र टॉवरच गेल्या ९ महिन्यांपासून बंद असल्याने संवादाची देवाणघेवाण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बहुतांश ग्राहकांनी बीएसएनएलची सेवा खरेदी केली आहे; मात्र सेवेचा पुरता फज्जा उडाल्याने सेवा असून नसल्यासारखीच आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील कोणतीच ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ बीएसएनएल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
-----
घरबसल्या संस्कृत
शिकण्याची संधी
रत्नागिरी ः घरबसल्या संस्कृत शिकण्याची संधी संस्कृतभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपापल्या आवडीनुसार १ पैकी एका माध्यमभाषेतून संस्कृत शिकता येऊ शकेल. संस्कृतीभारतीतर्फे संस्कृतप्रेमींसाठी ‘पत्रद्वारासंस्कृतम्’ या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रकिया सुरू केली आहे. मुंबई आणि उपनगरे, कोकण आणि गोव्यात राहणाऱ्या लोकांसाठी संस्कृतीभारती कोकण प्रांतातर्फे निःशुल्क ऑनलाइन वर्ग घेतले जातील. हा चारस्तरीय अभ्यासक्रम असून, दर ६ महिन्यांनंतर घरबसल्या परीक्षा, उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, समाविष्ट आयकेएस (IKS-भारतीय ज्ञानपरंपरा) अभ्यासक्रमास पूरक अभ्यासक्रम शिकवला जाईल. चारही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भगवद्गीता व इतर ग्रंथांचा अभ्यास करणे शक्य होईल. नावनोंदणीसाठी कृपया संस्कृतीभारतीच्या वेबसाइटला https://konkan.samskritabharati.in/ या पत्त्यावर भेट द्यावी, असे आवाहन संस्कृतभारतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

