बियाणी बालमंदिरमध्ये पाककला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
-rat१६p११.jpg-
P२६O३११८४
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरमध्ये आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
-----
चणाडाळीच्या पदार्थांची स्पर्धा
बियाणी बालमंदिरात आयोजन ; पालक भगिनींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिरामध्ये पालक भगिनींसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. चणाडाळीपासून गोड व तिखट पदार्थ बनवणे, हा विषय दिला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री बर्वे (प्रथम), द्वितीय श्रावणी पेढे, तृतीय निधी खेर, उत्तेजनार्थ दूर्वा नेवरेकर यांनी क्रमांक मिळवले. दुसऱ्या गटात प्रथम पूजा शिंदे, द्वितीय सुषमा सागवेकर, तृतीय जयश्री सावळे आणि उत्तेजनार्थ किरण महाजन यांनी क्रमांक मिळवले. ७० पालकभगिनी सहभागी झाल्या. परीक्षक म्हणून शिल्पा पानवलकर, सुधा गर्दे यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त प्रबंधक विनायक हातखंबकर, उपकार्यवाह श्रीकृष्ण दळी, सदस्य प्रवीण आंबेकर, सीताराम पाटील उपस्थित होते. परीक्षकांनी मुलांसाठी पोषणमूल्ये जास्तीत जास्त असावीत असे पदार्थ तयार करावेत, असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नमिता कीर यांनी महिला सक्षम असतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य हे प्रत्येक स्त्रीकडे असते. आपल्या मानमर्यादा राखून आपण मानाने जगले पाहिजे, असे सांगितले. या विषयाला अनुसरून अपर्णा गोगटे यांनी काव्यरचना वाचून दाखवली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

