शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे विजेते

शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे विजेते

Published on

-rat१६p१५.jpg-
OP26O31208
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे झेंडा दाखवून उद्घाटन करताना उद्योगमंत्री उदय सामंत. सोबत प्रसाद देवस्थळी व धावपटू.
--------
खिलारे, सिंग, धुळप, भिडे अव्वल
सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजन; गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे दुसरे पर्व उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन–दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. ५६ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीड येथील शरद खिलारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर महिलांच्या गटात रजनी सिंग यांनी अव्वल स्थान मिळवले. ३५ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीचे आदित्य धुळप आणि महिला गटात पुणे येथील श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी मध्यरात्री १२ वा. श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानाच्या आवारात राज्याचे उद्योग, मराठी भाषामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी स्पर्धेसंबंधी थोडक्यात माहिती देत डॉ. सामंत यांच्या खंबीर पाठबळाबद्दल आभार व्यक्त केले. त्यांचा सन्मान योगेश मोरे यांनी पालखीच्या आकारातील सन्मानचिन्ह देऊन केला.
या वेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, सुवर्णसूर्य फाउंडेशनने कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन या स्पर्धांमध्ये सातत्य राखले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक धावपटू सहभागी झाले असून, पुढील वर्षी ही संख्या दुप्पट होईल, अशी अपेक्षा आहे. भविष्यात रत्नागिरीचे नाव भारतातील सर्वांत मोठ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ओळखले जावे तसेच समुद्रामुळे प्रसिद्ध असलेले रत्नागिरी मॅरेथॉनमुळेही जगभर पोहोचावे.

चौकट १
हायड्रेशन पॉईंट
स्पर्धा मध्यरात्री १२ वा. सुरू झाली. भारतातील विविध राज्यांतील सुमारे २५० धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. रात्रीच्या धावासाठी प्रत्येक स्पर्धकाकडे हेडटॉर्च होती. मार्गावर दहा ठिकाणी हायड्रेशन पॉईंट ठेवण्यात आले होते. येथे पाणी, विविध फळे, एनर्जी ड्रिंक, सरबत, खजूर तसेच पाण्याच्या फवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.

चौकट २
स्पर्धेचा निकाल
५६ किमी- पुरुष गट – शरद खिलारे, राहुल पवार, मनीष यादव. महिला गट – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब.
५६ किमी वयोगट निकाल- ३५ वर्षांखालील – पुरुष : राहुल पवार, मनीष यादव, स्वप्नील सूर्यवंशी. ३६ ते ५० – पुरुष : शरद खिलारे, अमितकुमार यादव, अमोल पटेल. महिला – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब. ५१ वर्षांवरील – पुरुष : आशुतोष गोडबोले, संतोष गायकवाड, नीलेश सावंत. महिला – पूजा वर्मा
३५ किमी- पुरुष – आदित्य धुळप, संतोष शिंदे, रवींद्र. महिला – श्रुती भिडे, टिनू शर्मा, मानसी मराठे.
३५ किमी वयोगट निकाल- ३५ वर्षांखालील – पुरुष : आदित्य धुळप, संतोष शिंदे, अश्विनी पांडे. महिला – तनुश्री मालविय, प्रभांशी धनकर, ३६ ते ५० – पुरुष : रवींद्र, सीताराम नांदोसकर, डॉ. महेश भिसे. महिला – टिनू शर्मा, मानसी मराठे, सुरिंदर जम्मुअल, ५१ वर्षांवरील – पुरुष : वेंकटेश प्रभुदेसाई, डॉ. दादासाहेब सारंगकर, हेमंत भागवत, महिला – श्रुती भिडे, शेरिअन डौराडो, शालिनी वाझ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com