विलवडे-वाफोलीवासीयांचे आज क्रशर विरोधात ‘धरणे’

विलवडे-वाफोलीवासीयांचे आज क्रशर विरोधात ‘धरणे’

Published on

विलवडे-वाफोलीवासीयांचे
आज क्रशर विरोधात ‘धरणे’

विनापरवाना प्रकल्पांना तीव्र विरोध

सकाळ वृत्तसेवा
​बांदा, ता. १६ ः वाफोली आणि विलवडे भागात विनापरवानगी सुरू असलेल्या क्वारी व क्रशर प्रकल्पांच्या विरोधात आता स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या विनाशकारी प्रकल्पांमुळे परिसरातील निसर्ग आणि जनजीवनावर होणारे परिणाम लक्षात घेता, उद्या (ता. १७) सकाळी १० वाजता वाफोली-विलवडे सीमेजवळील क्रशर रोड येथे भव्य धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
​या आंदोलनाचे आयोजन स्थानिक कृती समितीच्या वतीने केले असून, गुणेश गवस यांनी यासंदर्भात माहिती दिली. वाफोली आणि विलवडे या दोन्ही गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन हा लढा उभारला आहे. या भागात सुरू असलेल्या क्रशर प्रकल्पांमुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच येथील वन्यजीव, जैवविविधता आणि निसर्गरम्य पर्यावरणाला मोठा धोका पोहोचत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ​आपल्या भागातील हरित वातावरण आणि जैवविविधता टिकवण्यासाठी ‘आता नाही, तर कधीच नाही’ असा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com